निर्देशांकांची जोरदार आगेकूच; परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी

मुंबई – निवडणुकानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार येईल, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे परदेशातून नकारात्मक संदेश आले तरी भारतीय शेअरबाजारात जोरदार खरेदी चालू आहे. त्यातच रुपया मजबूत होऊ लागल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत.

बुधवारी याच कारणामुळे बॅंकिंग आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन या क्षेत्रांचे निर्देशांक 1.42 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. मात्र, निर्देशांक आता उच्च पातळीवर असल्यामुळे काही सावध गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा काढून घेतल्यामुळे दूरसंचार, धातू, वीज, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक 2.6 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले.
बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 216 अंकांनी वाढून 37,752 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 40 अंकांनी म्हणजे 0.36 टक्‍क्‍यांनी वाढून 11,341 अंकांवर बंद झाला.

-Ads-

आज झालेल्या खरेदीचा फायदा इंडसइंड बॅंक, येस बॅंक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, स्टेट बॅंक, बजाज ऑटो, रिलायन्स, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंकेला झाला. या कंपन्यांचे शेअर्स 3.67 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.
मात्र बुधवारी भारतीय एअरटेलचा शेअर 4 टक्‍क्‍यांनी कोसळला त्याचबरोबर वेदांत, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि इंडिया या कंपन्यांचे शेअरही 3.40 टक्‍क्‍यांनी घसरले. रुपया मजबूत होत असल्यामुळे मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 2477 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केले.

एक्‍झिट फसल्यामुळे युरोपातील आणि आशिया खंडातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. मात्र, या घडामोडीचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर झाला नाही. महागाई वाढली आणि उत्पादन कमी झाले याची आकडेवारी जाहीर होऊनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)