अर्थसंकल्पाच्या तोंडावर निर्देशांक कोसळले

आर्थिक शिस्त सोडून सरकार सवलती देण्याची भीती

मुंबई -जागतिक विकासदर कमी होणार असल्यामुळे जागतिक शेअर बाजारांचे निर्देशांक कमी होत आहेत. त्यातच निवडणुकामुळे केंद्र सरकार अधिक अनुदान असलेला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. बॅंका, वाहन आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी सोमवारी सपाटून मार खाल्ला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 368 अंकांनी म्हणजे 1.02 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 35656 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 119 अंकांनी कमी होऊन 10661 अंकांवर बंद झाला. आजच्या विक्रीमुळे येस बॅंकेचे शेअर 5.46 टक्‍क्‍यांनी, बजाज फायनान्सचे शेअर 5.40 टक्‍क्‍यांनी तर आयसीआयसीआय बॅंकेचे शेअर 3.42 टक्‍क्‍यांनी कमी झाले.

अमेरिका चीनची व्यापारातील ताणाताणी व जागतिक विकासदर मंदावणार असल्यामुळे परदेशातून भारतीय शेअरबाजारातील निर्देशांकांना आधार मिळेनासा झाला आहे. त्यातच सवलतींची खैरात असणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून निवडणुकांमुळे सादर करण्याची शक्‍यता वाढली आहे. यामुळे शेअरबाजारात विक्री होत आहे.
-सुनील शर्मा, गुंतवणूक अधिकारी सॅक्‍टम मालमत्ता व्यवस्थापन

त्याचबरोबर आज झालेल्या मोठ्या विक्रीचा फटका इंडसइंड बॅंक, हिरोमोटो कॉर्प या कंपन्याना बसला. या पडत्या काळतही रुपयाच्या मूल्यात 7 पैशांनी वाढ होऊनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून विक्री केली. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजाराला दिशा मिळण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.

रुपया घसरत असल्यामुळे आणि जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 94 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 387 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशाकांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)