शेअरबाजारात विक्रीचे वारे; ग्राहक वस्तू, वित्त व आयटी क्षेत्रांवर परिणाम

मुंबई – जागतिक विकास दर मंदावणार असतानाच चीन आणि अमेरिकेत व्यापारावरून पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर आयटीसीसारख्या कंपन्यांचा नफा कमी असलेले ताळेबंद जाहीर झाल्यानंतर बुधवारी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कमी झाले.

बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 336 अंकांनी म्हणजे 0.92 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36108 अंकावर बंद झाला. कालही सेन्सेक्‍स नकारात्मक जागतिक संकेतामुळे 134 अंकानी कमी झाला होता. त्याबरोबर आज राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 91 अंकांनी कमी होऊन 10831 अंकांवर बंद झाला. त्याबरोबर मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे स्मॉल कॅप आणि मिडकॅप 0.28 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. आज झालेल्या विक्रीचा फटका ग्राहक वस्तू, वित्तीय क्षेत्रातील कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्याना बसला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुपयाचे मूल्य काही प्रमाणात अस्थिर झाल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 78 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 84 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे शेअर बाजारात नकारात्मक वातवरण निर्माण झाले.

याबाबत बोलताना जिओची वित्तीय सेवाचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील नकारात्मक वातरवरणामुळे परदेशी गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारही सावध होऊन व्यवहार करित असल्याचे शेअर बाजारात दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)