निवडक खरेदीमुळे निर्देशांक वाढले

रिऍल्टी, आयटी, ऊर्जा, बॅंकिंग क्षेत्र तेजीत

मुंबई – अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार युद्ध समाप्त करण्यासाठी बोलणी चालू झाली आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीची सुमार आडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढ कमी प्रमाणात करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतीक शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले. त्याचा फायदा भारतीय शेअर बाजारानाही होऊन निर्देशांकात वाढ झाली, आज झालेल्या खरेदीचा फायदा रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, ग्राहक वस्तू, बॅंकिंग आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांना झाला आसल्याचे दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 155 अंकांनी म्हणजे 0.43 टक्‍क्‍यांनी वाढून 35850 अंकांवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्‍स 36 हजारांवर गेला होता. मात्र, नंतर झालेल्या नफेखारीमुळे सेन्सेक्‍सला ती पातळी राखता आली नाही. शुक्रवारी सेन्सेक्‍स 181 अंकांनी वाढला होता. आज विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी वाढून 10771 अंकांवर बंद झाला.

चीनने रोख राखीव प्रमाण 1 टक्‍क्‍याने कमी करून 116 अब्ज डॉलरचे भांडवल खुले केल्यामुळे आशियायी शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारच्या व्यवहारानुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 240 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 157 कोटी रुपयांचा नफा काढून घेतला. पुढील आठवड्यात कंपन्यांचे ताळेबंद जाहीर झाल्यानंतर बाजाराला निश्‍चित दिशा मिळणार असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)