शेअर बाजारात 806 अंकांची घसरण

मुंबई: मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज तब्बल 806 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 35,200 अंकांच्या पातळीपर्यंत खाली गडगडला. राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक निफ्टी 259 अंकांनी कोसळून 10,599 अंकांवर बंद झाला.
रुपयाचे घसरणारे मूल्य आणि क्रूड तेलांच्या वाढणाऱ्या किंमतींचा परिणाम गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीवर झाला. जागतिक बाजारात क्रूडच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे रुपयाचे मूल्य आज ऐतिहासिक नीचांकावर गेले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी तेल कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे निर्देशांकांना कोणताही आधार मिळाला नाही.
“आयएफ ऍन्ड एलएफ’ या कंपनीचे संचालक मंडळ केंद्र सरकारने बदलले आहे. मात्र तरिही हा पेच नजीकच्या काळात सुटण्याची शक्‍यता कमी असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे बॅंकिंग आणि इतर क्षेत्राच्या शेअरच्या भावात घसरण होत राहिली. चंदा कोचर यांनी “आयसीआयसीआय’ बॅंकेचे पद सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळेही त्यामुळेही बॅंकांच्या शेअरवर परिणाम झाला. जागतिक वातावरण व्यापार युद्धामुळे खराब झाले आहे. चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान आयात शुल्क वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. अमेरिकेने इराणकडून तेल घेण्यास इतर देशांना मज्जाव केला आहे. एवढेच नाही तर इराणमधून इतर देशांकडे निघालेल्या तेलाच्या जहाजांवर हल्ले करण्याची धमकीही दिली आहे. या कारणामुळे क्रूडच्या किंमती 85 डॉलरच्याही पुढे गेल्या आहेत. याचा जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावरही नकारात्मक परिणाम होत आहे. कारण भारत आपल्या गरजेच्या 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्रूड आयात करतो. शेअर बाजारात झालेल्या या तुफान विक्रीमुळे सर्वच क्षेत्राच्या निर्देशांकावर परिणाम झाला.
गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान 
गेल्या दोन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1,357 अंकांनी कोसळल्यामुळे केवळ दोन दिवसात गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे मूल्य 5 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये हाहाकार माजला आहे. गेल्या महिन्यातही सेन्सेक्‍स मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले होते. ही पडझड कधी थांबणार, याचा अंदाज सध्या तरी कोणालाही येताना दिसत नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)