निर्देशांक कोसळल्याने 2.69 लाख कोटी रुपयांचे नुकसान 

मुंबई: जागतिक शेअर बाजारातील निर्देशांक गुरुवारी कोसळला. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही तुफान विक्री झाली. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी 759 अंकांनी म्हणजे 2.19 टक्‍क्‍यांनी कोसळून 34,001 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 225 अंकांनी कोसळून 10234 अंकावर बंद झाला. या कारणामुळे गुंतवणूकदारांचे गुंतवणूकीचे मूल्य एकाच दिवसात 2.69 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अमेरिकेबरोबरच जागतिक विकासदर कमी होणार असल्याचे सांगितले आहे. अमेरिका – चीन व्यापार युद्ध, वाढत असलेले क्रूडचे दर यामुळे जागतिक आर्थिक क्षेत्रात आगोदरच संदिग्धता निर्माण झाली असतानाच अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजार निर्देशांक कोसळले. त्याचा परिणाम चीनसह इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशांच्या शेअर बाजारावर झाला. या कारणामुळे सकाळी रुपयाचे मूल्यही कोसळले होते. मात्र नंतर रिझर्व बॅंकेने मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केल्यानंतर रुपयाचे मूल्य सावरले.
भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत आहे. चलन बाजार आणि शेअर बाजारातील परिस्थिती जागतिक कारणामुळे बिघडली असल्याचे स्पष्टिकरण अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले. मात्र तरिही त्याचा सकारात्मक परिणाम झाला नाही. आता मुंबई शेअर बाजारातील 370 कंपन्यांच्या शेअरचे भाव 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत.
आज झालेल्या भयंकर विक्रीनंतर शेअर बाजारात नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य 2,69,347 कोटी रुपयांनी कमी होऊन 1,35,70,402 कोटी रुपयांवर आले. या आगोदरच गेल्या सहा महिन्यात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक 14 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार, याबद्दल गुंतवणूकदार साशंक झाले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)