भाजप सरकार ‘देश आणि संविधाना’साठी धोकादायक : केजरीवाल

चंद्रबाबू नायडू आणि शरद यादव यांची घेतली भेट 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकी लक्षात घेता राजकीय पर्यायाची शक्यता शोधण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि लोकतांत्रिक जनला दल(यू) चे अध्यक्ष शरद यादव यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. आंध्रप्रदेश राज्यासह इतर चार राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. नेमकं याचवेळी नायडू याची केजरीवाल आणि शरद यादव यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सूत्रांच्या माहितीनुसार यादव आणि केजरीवाल शनिवारी सकाळी चंद्रबाबू नायडू यांना भेटण्यासाठी आध्रंभवन येथे गेले होते. दोघांनीही जवळजळळ अर्धा तास चर्चा केल्याचे समजते आहे. तीन राजकीय नेत्यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाचा पराभव करण्यासाठी पर्यायी राजकीय शक्ती मजबूत करण्यावर भर दिला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत धर्माच्या नावाखाली निवडणूका लढविणाऱ्या विरोधकांना पराभूत करण्याच्या धोरणावर चर्चा केली.

केजरीवाल यांनी नायडू यांच्या भेटीनंतर ट्विट करत भेटीविषयी माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ‘आमची भेट चांगली झाली आणि राष्ट्रीय मुद्दयांवर आम्ही चर्चा केली. काही वेळेकरिता शरद यादव आमच्यासोबत होते’. केजरीवाल पुढे म्हणाले, ‘आताचे भाजप सरकार ‘देश आणि संविधान’ या दोन्हीसाठी धोकादायक आहे. त्यासाठी देशभरातील लोकांनी एकत्र येऊन भारताच्या संविधानाचे संरक्षण केले पाहिजे’.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1056103571228409861

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)