पंतप्रधान म्हणून मोदींना दुसरा कार्यकाळ मिळणार नाही : शरद पवार यांचे भाकीत

File photo

मुंबई – पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना दुसरा कार्यकाळ मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप कदाचित सर्वांत मोठा पक्ष ठरू शकेल. मात्र, त्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्या स्थितीत आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोदींना स्वीकारले जाणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना आताच्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत, असे भाष्य केले. माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यानंतर राजकीय वारं ओळखून पवार यांनी माघार घेतली. त्यांची माघार हा युतीचा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचा समाचार पवार यांनी यावेळी घेतला.

मी राजकारणात 52 वर्षांपासून आहे. मी कधी हरलो नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांसारखे नेते कधी ना कधी हरले आहेत. मात्र, मी 14 वेळा निवडणुका जिंकलो. त्यामुळे पराभवाच्या भीतीने मी माघार घेतली असे म्हणणे बालीशपणाचे आहे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)