सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

मुंबई – ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मास्टर ब्लास्टर, माजी क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या “सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मात्र या भेटीचा तपशील समजू शकला नाही. ही भेट वैयक्‍तिक स्वरूपाची असल्याचे सांगितले जात असले तरी याभेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

ही वैयक्‍तिक भेट – मलिक
सचिनने शरद पवारांची घेतलेली भेट वैयक्तिक स्वरुपाची होती. याचा राजकारणाशी संबंध नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ही भेट वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे सांगत त्यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटविषयी भाष्य केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सचिननला देशद्रोही म्हणून ट्रोल केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सचिनची पाठराखण केली होती, असे देखील नवाब मलिक यांनी आवर्जून सांगितले.

सचिन तेंडुलकर हे सकाळी 11 वाजता सिल्व्हर ओक या ठिकाणी भेट घेतली. या चर्चेबाबत अधिकृतरित्या काहीच माहिती देण्यात आली नाही. भेटीनंतर सचिन तेंडुलकर यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. तेंडुलकर हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सिल्व्हर ओक येथे जाउन शरद पवार यांची भेट घेतली होती. मनसेच्या पाडवा मेळाव्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे तिथे गेले होते असे सांगण्यात आले. त्यामुळे पवार आता मनसेच्या पाडवा मेळाव्याला उपस्थित राहणार का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)