शरद पवारांची 24 रोजी कराडात सभा

प्रातिनिधिक छायाचित्र

कराड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवार दि. 24 रोजी कराडमध्ये होत आहे. कराड शहरात होणाऱ्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर जागेची पाहणी सोमवारी खा. उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली. सभेचे नेटके नियोजन करण्यात येत असून सभेला कराड-पाटण तालुक्‍यातील कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने त्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)