‘सचिन तेंडुलकर-सुनिल गावसकर’ यांची भूमिका योग्यच – शरद पवार

बीड – मी आयसीसी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, जगाचं क्रिकेट अनुभवलं. मात्र भारतात आज क्रिकेटसारख्या खेळातही वाद घडवले जात आहेत व सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर अशा महान खेळाडूंचा अपमान केला जात आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी परळी येथे झालेल्या सभेत व्यक्त केली.

परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे बोलताना ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनी एक भूमिका मांडली की भारताच्या खेळाडूंना पाकिस्तानशी क्रिकेट सामना करू द्या. त्यांचा पराभव करण्याची धमक आमच्या खेळाडूंमध्ये आहे. मात्र त्यांच्यावर जातीयवाद आणि पाकिस्तान प्रेमाचा ठपका ठेवला गेला, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

ज्यांनी सचिनवर आरोप केले त्यांना माहीत नाही वयाच्या १५व्या वर्षी सचिनने पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचा पराभव केला होता. पराभव करण्याची धमक ज्या सचिनमध्ये आहे त्यावर आरोप केले गेले याची खंत वाटते. याचे एकच कारण आहे. यांना विष पसरवायचे आहे. अशांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, शरद पवारांनी यावेळी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. मोदी सरकार धर्माच्या नावावर विष पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलं आणि सुनिल गावसकर आणि सचिन तेंडूलकर यांनी मांडलेल्या भूमिकेच समर्थन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)