मोदींविरोधात चंद्रबाबू नायडूंचे एकदिवसीय उपोषण;  शरद पवारांचा पाठिंबा 

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्रबाबू नायडू करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुध्दा नायडू यांना समर्थन दिले आहे.

शदर पवार यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, “आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांची दिल्लीत भेट घेतली. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्रबाबू नायडू करत आहेत, यास मी पाठिंबा दिला आहे’. केंद्र सरकारविरोधात त्यांनी पुकारलेल्या युध्दात महाआघाडीसुध्दा सोबत असल्याचे शदर पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा आणि राज्य पुर्नगठन अधिनियम, २०१४ नुसार केंद्रसरकाने आपले वचन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंध्रभवन एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत. नायडू यांच्यासमवेत टीडीपी पक्षाचे सर्व नेते उपस्थित आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)