इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे- शरद पवार

मुंबई: आरक्षण व इतर मागण्यांसाठी राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात येत आहेत. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते. मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असे म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सक्तीने टाळले गेले पाहिजे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)