शरद पवार राजकीय अष्टपैलू , पण ज्योतिषी नाहीत ; उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई: पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना दुसरा कार्यकाळ मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप कदाचित सर्वांत मोठा पक्ष ठरू शकेल. मात्र, त्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्या स्थितीत आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोदींना स्वीकारले जाणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार एक चांगले अष्टपैलू राजकारणी आहेत मात्र ज्योतिषी म्हणून त्यांची अजून ओळख झाली नसल्याचे म्हटले आहे.

पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आताच्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत, असे भाष्य केले होते. माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यानंतर राजकीय वारं ओळखून पवार यांनी माघार घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)