कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती
सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार गुरूवार दि.9 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, खा.पवार बुधवारी सायंकाळीच साताऱ्यात दाखल झाले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी कार्यरत असल्यामुळे पवारांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची सखोल माहिती यावेळी घेतली.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची गुरूवारी 60 वी पुण्यतिथी आहे. खा.शरद पवार हे दरवर्षीप्रमाणे गुरूवारी सकाळी साडे आठ वाजता पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेचे सदस्य ना.रामराजे ना.निंबाळकर, प्रा. डॉ. एन.डी.पाटील, आ.दिलीप वळसे-पाटील, आ.अजित पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विश्वजीत कदम आदी.उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी पुण्यतिथी कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार सद्य निवडणूक, निकाल आणि पंतप्रधानपदाबाबत काय भाष्य करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.