करुणानिधींना शरद पवारांकडून श्रद्धांजली

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. करुणानिधी यांच्या निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. करुणानिधी यांच्या निधनाबाबत ट्विट करताना शरद पवार यांनी “तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके पक्षाचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. करुणानिधी हे भारताच्या इतिहासामध्ये नेहमीच सामान्य जनतेचा नेता म्हणून ओळखले जातील. अशा दुःखद प्रसंगी आपण करुणानिधी यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना” असा संदेश दिला आहे.  तामिळनाडूचे माजी एम करुणानिधी यांची प्राणज्योत आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मावळली. प्रदीर्घ आजारापणा मुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)