निवडणूका आल्या की नरेंद्र मोदींच्या अंगात येत- शरद पवार 

बारामती: नरेंद्र मोदी इतर वेळी ठीक असतात, मात्र निवडणूका आल्या की त्यांच्या अंगात येत,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी केली आहे. तसेच मोदी साहेब आमचं घर भरलेलं घर आहे, ज्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच दुसऱ्याला माहित नाही त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये, असा कणखर टोला देखील पवारांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. आज बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेस शरद पवार बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा आणि भंडारा येथील प्रचार सभेत शरद पवारांवर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेला पवारांनी जोरदार उत्तर दिले. नरेंद्र मोदी भेटल्यावर त्यांना माझ्या कुटुंबाबद्दल माहिती देईल, असेही पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)