दाऊद इब्राहिमच्या आत्मसमर्पणाची संधी शरद पवारांमुळे हुकली : प्रकाश आंबेडकर

मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कुख्यात दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता. मात्र ही संधी शरद पवार यांच्यामुळे हुकली, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीचा मास्टरमाइंड दाऊद भारताला द्या, अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी होऊ इच्छितो. केवळ माझ्यावर थर्ड डिग्रीचा उपयोग करू नये अशी अट त्याने ठेवल्याचे जेठमलानी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना सांगितले होते. परंतु शरद पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच या निर्णयात युपीए सरकारही सहभागी होते, असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

जर दाऊद समर्पण करायला तयार होता, तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करून घेतले नाही, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. तसेच ज्यावेळी हे सर्व उघड झाले, त्या वेळी म्हणजेच 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बीजेपी सरकार होते, मग त्यांनी सुद्धा दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. शिवाय नरेंद्र मोदी पवारांच्या घरी कसे काय जातात, याचे उत्तरही द्यावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here