अभाविपतर्फे ‘शंखनाद २.०’ विद्यार्थी संमेलन

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येत्या शनिवारी ‘शंखनाद २.०’ या भव्य विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र व समाजाप्रती आजच्या युवकांची भुमिका, विद्यार्थी संघटनांचे महत्त्व, युवकांचे मतदानाद्वारे देशाचे भवितव्य अशा विविध विषयांना घेऊन या विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शंखनाद २.०’ हे विद्यार्थी संमेलन मॉडर्न कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर येथे दुपारी ०३:३० ते सायं. ०७:०० यावेळी होणार आहे. या विद्यार्थी संमेलनाला अभाविपचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री श्रीनिवासजी, सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पत्रकार मिलिंद भागवत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी हे प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील २००० विद्यार्थी मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहणार आहेत.
अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी, पुणे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‘शंखनाद २.०’ या विद्यार्थी संमेलनास सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)