शनीशिंगणापूरला भाविकांचा महापूर

नेवासे – शनी अमावस्येनिम्मित शनी शिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेला शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी शनी मूर्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे डॉ.राहुल हेगडे, खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्‍त जयेश शाह, पी.डी.पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झालेली अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत आहे. भाविकांच्या गर्दीने दर्शनपथ भरले गेले.

आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहनांसाठी वाहनतळ करण्यात आले आहे. देवस्थानच्या वतीने वाहनतळ, पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे चौथऱ्यावरील दर्शन बंद करण्यात आले होते.

-Ads-

शिंगणापूर येथील रस्ते गर्दीने फुलून गेले आहे. शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ.भाऊसाहेब कांबळे, आ.राहुल जगताप, माजी आमदार विलास लांडे मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, दिपक पटारे यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्‍तींनी शनिदर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने विश्‍वस्थांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)