शांघाय परिषदेत चीन, रशियाबरोबर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित

नवी दिल्ली – या आठवड्यात किरगीझस्तानची राजधानी बिश्‍केक इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या निमित्ताने चीन आणि रशियाबरोबर द्विपक्षीय चर्चा होईल. मात्र पाकिस्तानबरोबर कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले.

बिश्‍केक इथे 13 आणि 14 जून रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने चीन, रशिया व्यतिरिक्‍त यजमान किरगीझस्तानबरोबरही द्विपक्षीय चर्चा होईल. मात्र बैठकीच्यावेळी फारच मर्यादित वेळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे अन्य देशांबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेसाठीचे नियोजन बैठकीदरम्यानच केले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे पश्‍चिम विभागाचे सचिव गीतेश शर्मा यांनी सांगितले.

मात्र पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे. पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्दयावर एकमत निर्माण करण्याचा ठाम प्रयत्न या बैठकीदरम्यान भारताच्यावतीने केला जाईल, असेही कुमार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)