शेन वॉर्न याने आत्मचरित्रात केली पूर्व प्रशिक्षक जॉन बुकनन यांच्यावर टीका

महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने आत्मचरित्र ‘नो स्पिन’ हे  खूप गाजत आहे. त्याला अनेक करणे आहेत. ज्यात  अनेक सहकारी खेळाडूवर त्यांनी केलेली टीका तर काही संघव्यवथापनावर केलेले आरोप यांचा येथे समावेश आहे. वॉर्न यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक  खेळाडूंचं आणि प्रशिक्षकांची पोल खोलली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्यावर त्याने पुस्तकातून तो माझ्यावर जळत होता , तो सर्वात स्वार्थी खेळाडू होता अशी टीका केली होती. त्यानंतर त्याने पूर्व प्रशिक्षक जॉन बुकनन यांच्यावर टीका केली असल्याचे समजते आहे. त्याने पुस्तकात एका ठिकाणी  लिहले आहे की,  एजबेस्टन कसोटीनंतर बुकनन यांनी सर्व खेळाडूंची बैठक बोलावली होती. त्यावेळी अनेक खेळाडू विद्रोह करणार होते.

वॉर्न ने लिहले आहे की, त्या बैठकीत बुकनन यांनी सर्व खेळाडूंवर पराभवाचे  खापर फोडले. ते म्हणाले ,’तुम्ही चांगले खेळाला नाहीत. तिथपर्यंत ठीक होते, त्यानंतर त्यांनी का खेळाला नाहीत असे अनेक प्रश्न समोर मांडले’. त्यावेळी या  सर्व खेळाडू मान खाली घालून बसले होते. कोणालाही त्यांचाशी वाद घालायचा नव्हता. परंतु माझया आणि अन्य खेळाडूंमध्ये खूप राग भरला होता.  कारण त्यांनी आमच्या आत्मसन्मानाशी गोष्टी जोडल्या होत्या.

 

स्टीव्ह वॉ सर्वात स्वार्थी खेळाडू शेन वॉर्नची “नो स्पिन’ या आत्मचरित्रामध्ये टीका

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)