शौनक शिंदेला कुमार मुलांचे विजेतेपद ; सनत बोकीलला दुहेरी मुकुट 

जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 
पुणे: अग्रमानांकित शौनक शिंदेने सहावे मानांकन असलेल्या आरुश गलपल्लीचा कडव्या झुंजीनंतर पराभव करताना येथे सुरू असलेल्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील कुमार मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. तसेच द्वितीय मानांकित सनत बोकीलने आठवे मानांकन असलेल्या श्रीयांश भोसलेचा पराभव करत यूथ मुलांच्या विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला. रेडियंट स्पोर्टस ऍकॅडमी आणि टेबल टेनिस प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा सन्मित्र संघ येथे सुरू आहे.
कुमार मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात अग्रमानांकित शौनक शिंदेने सहावे मानांकन असलेल्या आरुश गलपल्लीचा 11-4, 7-11, 8-11, 11-3, 11-8, 11-13, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. तत्पूर्वी उपान्त्य फेरीत शौनकने चतुर्थ मानांकित आदर्श गोपालचा 3-11, 9-11, 11-9, 12-10, 8-11, 11-9, 11-9 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर उपान्त्यपूर्व फेरीत शौनकने आठवे मानांकन असलेल्या मिहिर दानकेचा 11-6, 11-7, 11-6, 11-5 असा एकतर्फी पराभव केला होता.
दुसऱ्या उपान्त्य लढतीत आरुशने द्वितीय मानांकित करण कुकरेजाचा 6-11, 11-8, 11-6, 11-6, 11-6 असा सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तसेच आरुशने त्याआधी तिसरे मानांकन असलेल्या श्रीयश भोसलेचा 9-11, 10-12, 14-12, 13-11, 12-10, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्यफेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला होता.
यूथ मुलांच्या एकेरीत द्वितीय मानांकित सनत बोकीलने आठवे मानांकन असलेल्या श्रीयांश भोसलेचा 11-7, 11-3, 11-3, 6-11, 11-8 असा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सनतचे हे स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे त्याने तत्पूर्वी पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावल्याने त्याने दुहेरी मुकुटाचा मान मिळविला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)