#लोकसभा2019 : मुंबईत उर्मिलाला मनसेची साथ ?

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार व प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या राजकीय इनिंगला मनसे शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसेची उर्मिलला साथ मिळणार का..?अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी याबदल आपल्या फेसबुक अकाउंटवरून उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या राजकीय इनिंगला शुभेच्छा देताना म्हणले आहे की,

प्रिय ऊर्मिला,

सस्नेह जय महाराष्ट्र !

स्वतः तील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस.

आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे.

महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे. तुझ्या या नव्या इनिंगला ‘मनसे’ शुभेच्छा!

दरम्यान, बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उर्मिलाने पक्षप्रवेश केला. कॉंग्रेसकडून उर्मिला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)