तनुश्री दत्ता -नाना पाटेकर यांच्या प्रकरणावर असा घेतला शक्ती कपूरने ‘चिमटा’ 

बॉलीवूडमध्ये सध्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण खूप गाजत आहे. तनुश्री दत्ताने  २००८ साली एका चित्रपटाच्या वेळी आयटम सॉंग शूट केले जात असताना नाना पाटेकर यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले असल्याचे आरोप लावले आहेत. यावर नानाकडून काही प्रतिक्रिया आली नाही.  कारण ते सध्या जैसलमेरमध्ये हाऊसफुल-४ चे शुटींग करत आहेत.

या प्रकरणात अनेक बॉलीवूड सेलेब्सनी आपली बाजू मांडली आहे. एका कार्यक्रमाच्यावेळी शक्ती कपूरला  या प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले,”  मला या विषयी काही माहिती नाही. ही १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी लहान होतो.”  यामध्ये त्यांनी कोणाचा पक्ष घेतला नाही परंतु त्यांच्या या टिपण्णीमुळे ते या प्राकारणाला किती महत्व देतात हे समजले आहे.

तनुश्री दत्ता यांना अनेक बॉलीवूड कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. त्यात फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, टि्वंकल खन्ना, हंसल मेहता, ऋचा चड्डा आणि स्वरा भास्कर या कलाकारांचा पाठिंबा मिळाला आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता  यांना कायदेशीर नोटीस बजावली असल्याची चर्चा  आहे तर शुटींग संपवून आल्यास ते या मुद्यावर  प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली बाजू मांडू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)