पराभवाची परतफेड केल्याने आनंदी – शाकिब अल हसन

ढाका – काही महिन्यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या मानहानीकारक पराभवाची परतफेड केल्याने मी आनंदी आहे अशी प्रतिक्रीया बांगलादेश कसोटी संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने दुसऱ्या कसोटीमध्ये वेस्ट इंडिज संघाला एक डाव आणि 184 धावांनी पराभूत करून दोन कसोटी सामन्याची मालिका 2-0 अशी जिंकल्यावर दिली आहे.

मालिका जिंकल्यावर तो म्हणाला, मला माझ्या संघाकडून अश्‍याच खेळीची अपेक्षा होती. मी संघातील खेळाडूंकडून नेहमीच खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि या मालिकेत त्यांनी मला निराश केले नाही. मायदेशात वेस्ट इंडिजने आम्हाला दोन्ही कसोटीमध्ये मोठ्या फरकाने हरविले होते. त्यामुळे या मालिकेत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची सर्वांना अपेक्षा होती. परंतू, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करत मालिका जिंकली. वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी त्यांच्या जलदगती गोलंदाजांना पूरक खेळपट्ट्या बनविल्या आणि त्याचा फायदा घेतला. तर येथे आम्ही आम्हाला पूरक परिस्थिती निर्माण केली.

-Ads-

या मालिकेत बंगलादेशच्या चार फिरकी गोलंदाज शाकिब, मेहेंदी हसन, तैजुल इस्लाम आणि नईम हसन यांनी 40 बळी घेतले आहेत. या मालिकेत त्यांच्या एकाही वेगवान गोलंदाजाला बळी मिलवता आला नाही हे विशेष. कसोटी मालिकेतील हा विजय बांगलादेशसाठी मोठा विजय ठरला आहे.

कारण, त्यांनी खेळलेल्या 111 कसोटी सामन्यात प्रथमच त्यांनी मालिकेतील दोन्ही सामन्यात विरोधी संघाला फॉलोऑन दिले आणि दोन्ही सामन्यात एका डावाने विजय मिळविला. याबाबत बोलताना शाकिब म्हणाला, बांगलादेश मागील 18 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यात आम्ही 100 पेक्षा जास्त सामने खेळले परंतु फॉलोऑन देऊन मालिका विजयाची ही पहिलीच वेळ त्यामुळे हा विजय आमच्यासाठी खूप स्पेशल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)