दुबईमध्ये एका गूढ महिलेशी शाहरुख खानची भेट 

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने अलिकडेच दुबईमध्ये एका गूढ महिलेची भेट घेतली आणि या भेटीवर आधारीत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान मदिनातच्या आजूबाजूला भटकताना दिसतो आहे. त्याचवेळी त्याची भेट एका महिलेबरोबर होते. ही महिला शाहरुखला एक बंद बॉक्‍स देते. हा बॉक्‍स मिळाल्यावर शाहरुख खान शहरात लपवून ठेवलेली मौल्यवान रत्ने शोधायला पळतो.

या व्हिडीओमध्ये शाहरुख म्हणतो की. “मदिनात शहरात मी मजेत हिंडत होतो. त्याच वेळी एक महिला आली आणि “हदिया मिन दुबई इक्ताशिफहा.’ असे मला म्हणाली,’ त्याच्या या व्हिडीओमुळे ही महिला कोण, तिने त्याला काय दिले आणि शाहरुख काय शोधायला पळाला, असे प्रश्‍न मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे. वास्तविक हा व्हिडीओ म्हणजे कोणत्याही सिनेमाचे प्रमोशन नाही. हा व्हिडीओ दुबईच्या पर्यटनासाठीच्या “बीमाईगेस्ट’चे प्रसिद्धी अभियान आहे. लोकांच्या मनात दुबईचे आकर्षण निर्माण करणे आणि जास्तीत जास्त पर्यटकांना दुबईच्या दौऱ्यावर येण्यासाठी उद्युक्‍त करणे हा आहे. दुबई पहायला या असे निमंत्रणच या व्हिडीओच्या निमित्ताने दिले जाते, पण शाहरुखने त्या जाहिरातीचा वापर आपल्याबद्दल अधिक चर्चा व्हावी असा करून घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)