मेलबर्न फिल्म फेस्टिवलला हजेरी लावणार शाहरुख खान

मेलबर्न येथे होणा-या भारतीय फिल्म फेस्टिवल-2019ला लवकरच प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाची सुरुवात 8 ऑगस्ट रोजी होणार असून तो 17 ऑगस्टपर्यंत पार पडणार आहे. या महोत्सवात स्पेशल गेस्ट म्हणून बॉलीवूडमधील किंग खान अर्था शाहरुख खान हजेरी लावणार आहे. यावेळी फेस्टिवलची थीम “साहस’वर आधारित आहे.

किंग खानने ग्लोबल लेव्हलवर आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. या महोत्सवाला शाहरुख 8 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे शुभारंभ करणार आहे. शाहरुख खान म्हणाला, या महोत्सवासाठी मला मुख्य अतिथी म्हणून बोलविल्याने मी व्हिक्‍टोरियन सरकार आणि मेलर्बनच्या इंडियन फिल्म फेस्टिवलचे आभार मानतो. भारतातील एवढया मोठया आणि विविधता असलेल्या चित्रपटसृष्टीचा आनंद सोहळा उत्साहाने साजरी करणे योग्य आहे.

यावर्षी फेस्टिव्हलची थीम “साहस’ असल्याने मी खूपच आनंदी आहे. साहस ही एक भावना आहे, जी लेखकाच्या माध्यमातून समोर येते. तसेच यातून समाज आणि जग बदलण्याची क्षमता मिळते, असे शाहरुख खान म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)