कॅन्सरला ‘हरवलेल्या’ लहानग्यांची शाहरुखने घेतली भेट  

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने कॅन्सर या दुर्धर रोगाला यशस्वीपणे हरवलेल्या लहानग्यांची आज त्याच्या निवास्थानी भेट घेतली. कॅन्सरला हरवलेल्या या मुलांची जागतिक स्तरावरील एक स्पर्धा माॅस्को येथे होणार असून, जगभरातील कॅन्सर रोगावर मात करणारी लहान मुले या स्पर्धेत भाग घेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेसाठी माॅस्कोला जाण्याआधी या मुलांना शाहरुखने त्याच्या निवासस्थानी ‘मन्नत’ला आमंत्रित केले होते. शाहरुख खानने त्याच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मीर फौंडेशनच्या वतीने या मुलांना स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सामग्री भेट केली.

-Ads-

मुलांसोबत भेटीच्या अनुभवाबाबत बोलताना शाहरुख म्हणाला की “आज मी ज्या मुलांना भेटलो ती आधीपासूनच आपल्या आयुष्यामध्ये विजेती आहेत. माझ्याकडून त्यांना रशिया मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)