“बदला’साठी शाहरुख-अमिताभ एकत्रित

बॉलीवूडमधील बीग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि किंग खान म्हणजे शाहरुख खान यांना दर्शकांनी “कभी खुशी, कभी गम’पासून “वीर जारा’पर्यतच्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित अभिनय करताना पहिले आहे. पण “बदला’ चित्रपटासाठी दोघे कलाकार वेगवेगळया कारणसाठी एकत्रित आले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे कलाकार, तर शाहरुख खान हा चित्रपटाचा निर्माता आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे की, हे दोन दिग्गज कलाकार निर्माता आणि अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

या जोडीने नुकताच “बदला’ चित्रपटासाठी एक विशेष व्हिडिओ शूट केला असून तो लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या व्हिडिओत शाहरुख-अमिताभ हे चित्रपटाबाबत एक विशेष आणि व्यापक चर्चा करताना दिसतील. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष म्हणाले, दोन महान कलाकारांसोबत काम करताना जबाबदारी आणखीन वाढते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हा असा क्षण आहे, ज्याचे शब्दांत वर्णन होवू शकत नाही. दरम्यान, “बदला’मध्ये पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची जोडी झळकणार आहे. यापूर्वी ही जोडी “पिंक’ चित्रपटात झळकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)