शाहिदच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटला डॉक्टराने केला विरोध

मुंबई- अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफीवर जोरदार कमाई केली आहे. प्रेक्षकांनी ‘कबीर सिंह’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्ब्ल 20.21 करोड रुपयांची जोरदार कमाई केली आहे. 2019 मधील सर्वात मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘कबीर सिंह’च्या देखील नावाचा समावेश झाला आहे. मात्र  ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर मुंबईच्या या डॉक्टरने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या सिनमात शाहिद कपूरने एका सनकी आणि अग्रेसिव्ह डॉक्टरची भूमिका साकारली आहे. यामुळे डॉक्टर्सच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचा तक्रारकर्त्या डॉक्टरचा दावा आहे. चित्रपटातील हिरो दारूच्या नशेत ऑपरेशन करतो. हे दृश्य वैद्यकीय पेशाची प्रतिमा मलिन करणारे आहे,असेही या डॉक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य राज्य मंत्री आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून त्याने या सिनेमाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे. ‘कबीर सिंह’ हा तेलगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी देखील देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here