शाहिद कपूरच्या “इश्‍क-विश्‍क’चा येणार सीक्‍वल

बॉलीवूडमधील चॉकलेटी बॉय शाहिद कपूर याचा 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिला चित्रपट “इश्‍क-विश्‍क’ चित्रपटाचा लवकरच सिक्‍वल येणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याची तयारी सुरू झाली असून चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम सुरू आहे. या चित्रपटाबाबत लवकरच प्रसिद्ध निर्माता रमेश तौरानी हे घोषणा करणार आहेत.
रमेश तौरानी म्हणाले, होय, आम्ही लवकरच “इश्‍क-विश्‍क’चा सीक्‍वल बनविणार आहोत.

या चित्रपटाची स्क्रिप्ट प्राथमिक स्वरूपात तयार आहे. यात कॉलेज रोमांस किंवा टीनेज रोमांस प्रेक्षकांना अनुभवात येणार आहे. मला आशा आहे मी, पुढील दोन ते तीन महिन्यात स्क्रिप्ट फायनल होवून चित्रपटाच्या डायरेक्‍टर आणि कलाकारांची निश्‍चिती करण्यात येईल.

रमेश तौरानीने एक खुलासा करताना सांगितले की, शाहिदसोबत माझी पहिली भेट 1999मध्ये “आंखों में तेरा ही चेहरा’ या म्यूझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान झाली. त्यावेळी तो खूपच तरुण होता. त्यामुळे मी त्याला आणखीन 2 ते 3 वर्ष वाट पाहण्यास सांगितले. त्यानंतर जेव्हा “इश्‍क-विश्‍क’ची स्क्रिप्ट आली तेव्हा मी शाहिदचे नाव सुचविले.

दरम्यान, केन घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या “इश्‍क-विश्‍क’मधून शाहिद कपूरने बॉलीवूडमध्ये पर्दापण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता राव आणि शहनाज ट्रेजरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. शाहिद कपूर सध्या “कबीर सिंह’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत कियारा आडवाणी झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)