शाहिद कपूरला कर्करोग झाल्याची अफवा

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो, अभिनेता शाहिद कपूरला कर्करोग झाली असल्याची अफवा पसरली आहे. पण कपूर कुटुंबियांनी हे वृत्त फेटाळले असून शाहिदची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचा लेख एका फिल्मी वेबसाईटने नाव न घेता छापला होता. शाहिद कपूरकडे अंगुलीनिर्देश करणारे या लेखातील अभिनेत्याचे वर्णन होते. त्यानंतर शंकांचे वादळ चाहत्यांमध्ये उठले आणि या बातमीमागील तथ्य जाणण्याचा जो-तो प्रयत्न करु लागला.

यासंदर्भातील एका वाहिनीने दिलेल्य माहितीनुसार शाहिद कपूरच्या कुटुंबीयांनी या अफवा तथ्यहीन असल्याचे सांगत त्यांनी फेटाळून लावल्या. त्याचबरोबर कपूर कुटुंबाने ही बातमी कुठून आली? अशा बातम्या पसरवण्यात कोणाला काय आनंद मिळतो?, असे प्रश्न उपस्थित केले.

-Ads-

शाहिदला कर्करोगविषयक अफवांची कुणकुण लागताच त्या हसूच फुटले. सध्या वैयक्तिक कामासाठी शाहिद दिल्लीला गेला असून दोन दिवसांनी मुंबईत परतणार आहे. दरम्यान यापूर्वी, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर कपूर खानदानाने चाहत्यांना धीर ठेवण्याचे आवाहन केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)