शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कालच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शाहिद आणि मीराचे हे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट 2016 रोजी या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्या मुलीचे नाव त्यांनी मीशा ठेवले होते.

त्यानंतर कालपासून शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता त्याच्या चाहत्यामध्ये वाढली होती. काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड करतेय. पण आता मात्र शाहिदच्या चाहत्यांची उत्सुकता थांबली आहे कारण अखेर शाहिद कपूर याने त्याच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. स्वत: शाहिदने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून याची माहिती दिली आहे.

शाहिद आणि मीरा यांनी आपल्या मुलाचे नाव ‘झैन कपूर’ ठेवले आहे. शाहिदने मुलाच्या नावाचा खुलासा करताना ट्विटरवर म्हटले आहे की,  ‘झैन कपूर’ इकडे आहे. आणि आता आमचं कुंटुंब पूर्ण झालं आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. आम्ही सर्व खूप खुश आहोत. सर्वांना खूप सारे प्रेम.

शाहिद याच्या मुलाचे नाव खरच खुप सुंदर आहे.  ‘झैन’ हा एक अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो साहब. तसेच या नावाचे आणखी अर्थ आहे.  ‘झैन’ म्हणजे सुंदर, सौंदर्य, प्रेमळ आणि मित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)