बोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस

खा.श्री. उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य

सातारा – बोरगाव येथे असणाऱ्या हॉटेल महाराज पॅलेस येथे दि. 24 रोजी शहीद जवान कृतज्ञता दिवसानिमित्त सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना कृतज्ञता भोजन हा श्रद्धांजलीपूरक कार्यक्रम श्री. छ. उदयनराजे मित्र समूह यांच्यातर्फे देण्यात आला आहे.

याप्रसंगी कर्नल आर. आर. जाधव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा), मेजर भानुदास जरे (व्यवस्थापक टी. सी. पी. सी. करंजे, सातारा), सुभेदार विलासराव घाडगे (सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा) यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने उदयनराजेंनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आदेशाचे पालन करत या दिवशी शहीद जवानांप्रती असलेली आपली कृतज्ञता म्हणून या कृतज्ञता भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी 12 ते रात्री 11 पर्यंत हा भोजनाचा कार्यक्रम सर्व आजी, माजी सैनिक व कुटुंबिय यांच्यासाठी सुरू राहणार आहे, असे श्री. छ. उदयनराजे प्रेमी मित्रसमुहातर्फे घोषित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)