माजी खासदार शहाबुद्धीन यांच्या साथीदाराची हत्या

सिवान (बिहार) : राजद नेता व माजी खासदार शहाबुध्दीन यांच्या एका निकटच्या सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात इसमांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली त्यामुळे या गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मोहंमद युसुफ असे ठार झालेल्या इसमाचे नाव असून तो चाळीस वर्षांचा होता. शहाबुद्धीन यांचा तो उजवा हात मानला जात होता.

स्वत: शहाबुद्धीन हे सध्या दुहेरी हत्या प्रकरणात तिहार कारागृहात आहेत.मोहंमद युसुफ हा सिवान या शहाबुद्धीन यांच्या प्रभाव क्षेत्रात त्यांच्या घरा शेजारीच राहात होता आणि तो या मतदार संघात सतत शहाबुद्धीन यांच्या समवेत दिसायचा. या हत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. शहाबुद्धीन हे सध्या कारागृहात असल्याने त्यांच्या पश्‍चात त्यांचे साम्राज्य सांभाळण्याचे बहुतेक काम मोहंमद युसुफ हाच करीत होंता. तो शहाबुध्दीन यांचा जवळचा नातेवाईक आहे अशीही माहिती मिळते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)