बॉलीवूडमधील बीग बी अमिताभ बच्चन आणि ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांच्या “सत्ते पे सत्ता’ चित्रपटाचा लवकरच रीमेक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटातून फराह खानसोबत रोहित शेट्टी आपल्या प्रॉडक्शनला आणखीन ग्रॅंड करण्याच्या तयारीत आहे.
बॉलीवूडमधील या बिग बजेट असलेल्या महत्वाकांक्षी प्रॉजेक्टचे काम निर्मात्यांनी सुरूही केले असून आता फक्त कास्ट करण्याचे काम बाकी आहे. या चित्रपटासाठी डायरेक्टर-प्रड्यूसर बॉलीवूडमधील स्टार कलाकारांच्या नावांचा विचार करत आहे. यासाठी किंग खान अर्थात शाहरुख खान आणि कतरीना कैफ ही जोडी निश्चित केली असल्याचे मानले जात आहे. हे खरे ठरल्यास शाहरुख-कतरीनाचा हा तिसरा चित्रपट ठरेल. यापूर्वी त्यांनी “झिरो’ आणि “जब तक है जान’ या चित्रपटात काम केलेले आहे.
दरम्यान, फराह खानला शाहरुखसोबत काम करणे पसंद आहे. “हॅपी न्यू इयर’नंतर या चित्रपटातून शाहरुखसोबत कमबॅक करणे योग्य असल्याचे फराह खानला वाटते. ही कल्पना रोहितला आवडली असून फराहला कतरीनाही आवडते आणि तिच्यासोबत की कम्फर्टेबल असते. तसेच दोन्ही कलाकारांनीही स्क्रिप्टबाबत उत्सुकता दर्शविली आहे. आता फक्त त्यांचे प्रॉजेक्ट साईन करणे बाकी आहे. जर सर्व काही जुळून आल्यास हे चौघेजण प्रथमच एकत्रित काम करणार आहेत.