रुपयाचे ‘अवमूल्यन’ इतर चलनांच्या तुलनेत कमीच : शहा

प्रातिनिधिक छायाचित्र
हैद्राबाद: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना रुपयाच्या मूल्याची डॉलर प्रति होत असलेली घसरण ही इतर देशांच्या चलनांच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीपेक्षा ‘कमी’ असल्याचा दावा केला. यावेळी बोलताना अमित शहा यांनी इंधनाच्या वाढत्या भावांबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चीन-अमेरिका यांच्या दरम्यान चालू असलेले व्यापारयुद्ध, तेल उत्पादक देश व अमेरिका यांच्या दरम्यान सुरु असलेले वाद हे इंधन दरवाढीच्या मुळाशी आहेत.” असं त्यांनी सांगितलं.
“रुपयाच्या अवमूल्यनाबाबत व वाढत्या इंधन दरांबाबत भाजपा व केंद्र सरकार चिंतीत असून, लवकरच आम्ही इंधनाच्या वाढत्या किमतींबाबत व रुपयाच्या अवमूल्यनाबाबत तोडगा काढू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)