शाह फैजल यांच्या पक्षाची लोकसभा निवडणूकीतून माघार 

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील माजी प्रशासकीय अधिकारी शाह फैजल यांच्या “जम्मू काश्‍मीर पीपल्स मुव्हमेंट’ या पक्षाने लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मात्र नागरिकांनी योग्य उमेदवारास निवडून देण्यासाठी या निवडणूकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर निवडणूका लढवण्यासंदर्भाच्या वेगवेगळ्या शक्‍यतांबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. या वेळी लोकसभा निवडणूका न लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे फैजल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपला पक्ष नवीन असून सध्या कमी शक्तीवर काम करत आहे. ही क्षमता वाढवण्याची गरज असून आगोदर व्यापक जनसंपर्कावर भर देणार असल्यानेच यंदा लोकसभेच्या निवडणूकीत उतरणार नसल्याचेही फैजल यांनी स्पष्ट केले. या निवडणूकीमध्ये “जेकेपीएम’ पक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देईल, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. मात्र नागरिकांनी योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी भरपूर मतदान करावे, असेही फैजल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)