शबरीमला प्रकरणी अंदोलन भडकले

दोन महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या निषेधार्थ रस्ता रोको, दगडफेक आणि जाळपोळ

तिरुवनंतपुरम (केरळ) : दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. ठिकठिकाणी वाहतुक रोखण्यात आली, रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि दगडफेकही झाली. या हिंसक आंदोलनादरम्यान भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाला. या हिंसाचारात 79 बसचे नुकसान झाले तर 31 पोलिस जखमी झाले. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

हिंसाचाराला भाजप आणि संघ जबाबदार – विजयन
केरळमधील या हिंसाचाराला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी केला आणि या हिंसाचाराच्या दोषींवर कारवाईचा इशारा दिला. हे आंदोलन पूर्वनियोजित आणि हेतूपुरस्सर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाची परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास मुख्य पुजारी उत्सुक नसल्याने त्यांनी आपले पद सोडले पाहिजे, अशी अपेक्षाही विजयन यांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध हिंदुत्ववादी संघटनांची पालक संघटना असलेल्या शबरीमला कर्मा समिती आणि अंतराष्ट्रीय हिंदू परिषदेने संध्याकाळपर्यंत शबरीमला परीसरात पूर्ण बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यभर ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलने केली. सत्तारुढ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीची कार्यालये आणि वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. आंदोलनकर्ते कार्यकर्त्यांची पोलिस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर ठिकठिकाणी हिंसक बाचाबाची झाली. अशाच आंदोलनादरम्यान थ्रिसुरमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाला.

भारतीय कम्युनिस्ट आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांवरही हल्ले झाले. पक्कडमध्ये एका स्थानिक बिडी कारखान्यावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आला. तर नेदुमान्गादू येथेही असाच क्रूड बॉम्ब फेकण्यात आला. पण त्यात काही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी काही ठिक़ाणी बसची तोडफोड झाली. हिंसाचाराची शक्‍यता लक्षात घेऊन राज्य परिवहन बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. केवळ काही रिक्षा रस्त्यांवर सुरु होत्या. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यलयाच्या गच्चीवरून झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या एका व्यक्‍तीचे बुधवारी रात्री निधन झाले. मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी मात्र या व्यक्‍तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्‍याने झाल्याचा दावा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)