शबरीमला प्रकरणी भाजपकडून बेमुदत साखळी उपोषण सुरु

तिरुवनंतपूरम: शबरीमला प्रकरणी केरळमधील भाजप कार्यकर्त्यांनी आजपासून केरळ सचिवालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस ए.एन.राधाकृष्णन यांनी उपोषणाला सुरुवात केली. केरळमधील 14 जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. भाजपच्या खासदार सरोज पांडे यांनी साखळी उपोषण आंदोलनाची सुरुवात केली.

केरळमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालील “एलडीएफ’ सरकार नागरिकांच्या इच्छेविरोधात वागत असून शबरीमला मंदिराचा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करणार असल्याचेही सांगितले. राज्य सरकार शबरीमला मंदिराच्या बाबत जे काही करत आहे, त्याचा फेरविचार व्हायला हवा. चर्चेचा मार्ग सतत खुला असतो, असे त्यांनी सांगितले.

-Ads-

शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दिला. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीला भाजपकडून विरोध केला जात आहे.
राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील “युडीएफ’ने भाविकांना पाठिंबा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)