कंगनाला शबाना आझमी यांचे सडेतोड प्रत्युत्तर

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. देव आपलं भलं करो, असं शबाना आझमी यांनी कंगनाला उत्तर दिलं आहे. शबाना आझमी आणि जावेद अख्तर देशद्रोही आहेत, असं कंगना म्हणाली होती.

शबाना आझमी एका मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांना कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्यावर प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या, जेव्हा देश एकत्र होऊन पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत दु:ख प्रकट करत आहे. हल्ल्याचा निषेध करत आहे, अशा वेळी वैयक्तिक हल्ल्याला काही महत्व आहे का? देव आपलं भलं करो, असं शबाना आझमी म्हणाल्या.

दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर बोलताना कंगनाने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला होता. जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचे अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे “भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचे समर्थन करतात. फिल्म इंडस्ट्री अशा देशद्रोही लोकांनी भरली आहे, असे ती म्हणाली होती. शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्याक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. यावरुन कंगनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)