लैंगिक शोषण ; गुड टच आणि बॅड टच शिकविणारा शिक्षक गजाआड

हडपसर – सासवड रस्त्यावरील लेक्‍कसिकोन इंग्लिश मीडियमच्या शाळेत “गुड टच आणि बॅड टच’चे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाकडूनच 4 विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करण्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गेल्या 10 महिन्यांपासून होत होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक केली आहे.

आनंद काळे (वय 40), असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे. तो काळेपडळ येथे राहतो. जानेवारीमध्ये एका मुलाबाबत हा प्रकार घडला. त्यानंतर शिक्षक काळे याने अन्य 3 मुलांचे लैंगिक शोषण केले. स्थानिक मुलाने पुढाकार घेतल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर पीडित चार मुलांचे पालक एकत्र येऊन शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी पालकांची मिटिंग सुरू होती. ती मुले पालकांना घेऊन शाळेत आली होती. परंतु त्यांनी काही सांगितले नाही, असे शाळेकडून सांगण्यात आले. पोलिसांनी त्यांना नेले. तेव्हा आम्हाला समजले, तो शिक्षक कायमस्वरुपी कामावर आहे. शाळा प्रशासनाने तातडीने या शिक्षकाचे निलंबन केले आहे. चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्याला शाळेत घेतले जाणार नाही, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)