सेवूल शांतता पुरस्कार केवळ मला नाही तर १३० कोटी भारतीयांना : पंतप्रधान मोदी

सेवूल येथील भारतीय समुदायासोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

सेवूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दक्षिण कोरिया येथील सेवूल शहरामध्ये ‘सेवूल शांतता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना सेवूल शहरामध्ये दक्षिण कोरियातील भारतीय समुदायास संबोधित केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “माझा उद्या ‘सेवूल शांतता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार १३० करोड भारतीय आणि ३ करोड अनिवासी भारतीयांच्या कष्टांचा हा गौरव आहे. मी केवळ भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारणार आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1098567647824887808

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)