चीनमधील कारहल्ल्यात सात ठार 

पोलिसांच्या गोळीबारात चालकाचा मृत्यू 
बिजिंग – चीनमधील ह्युबेई येथे गजबजलेल्या परिसरात बेदरकारपणे कार घुसवल्याने सात जण ठार झाले. तर सहा ते सात जण जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी गोळीबार केला असता या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे. कुई लिडोंग असे ठार मारण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. तो येथील एका रेस्टारंटचा मालका असून घरगुती वाद निर्माण झाल्याने त्याने हा हल्ला घडवून आणला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ह्युबेई प्रांतातील झाओयांग शहरात शुक्रवारी सकाळी वेगवान कार अचानक गर्दीत घुसली. नेमके काय झाले हे समजण्याआधीच कारने अनेकांना धडक दिली. या घटनेत सात जणांचा मृत्यू, तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहनचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. अखेर पोलिसांनी चालकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला.

चालकाच्या कारमधून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन त्याने जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, चीनमध्ये काही महिन्यांमध्ये अशा स्वरुपाच्या घटना वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)