शिरुरच्या मतमोजणीत सात ईव्हीएम बंद

व्हीव्हीपॅटद्वारे करावी लागली मतमोजणी

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील सात ईव्हीएममध्ये तांत्रीक बिघाड झाल्यामुळे अखेर व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. त्यानुसार अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत ही मोजणी सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी गुरुवारी व्यवस्थितपणे सुरू होती. परंतू, 22 व्या फेरीनंतर काही ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या मशीनमधील मते मोजता येत नव्हती. त्यामध्ये आंबेगाव, शिरूर, जुन्नर, हडपसर, भोसरी येथील एकूण सात मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होती. त्याबाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले. त्यानंतर त्यांनी या मशीनचे व्हीव्हीपॅट मोजणी करण्याचा निर्णय घेताला. त्यासाठी अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही मोजणी करण्यात आली. त्यामुळे काही फेऱ्यांना उशीर झाला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी ही मोजणी करत रात्री उशिरा फेऱ्या पूर्ण केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)