प्रजासत्ताक दिनादरम्यान सात दिवस दिल्लीच्या हवाई सीमा राहणार बंद

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमानिमित्त दिल्लीच्या हवाई सीमा काही वेळ बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही विमान उड्डाणे रद्द करण्यात येतील, तर काहींच्या वेळात बदल करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाने प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी दिल्लीच्या हवाई हद्दीतील वाहतूक कमी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दिनांक 18,20,21,22,23,24 आणि 26 जानेवारी रोजी काही काळ दिल्लीच्या हवाई सीमा सील करण्यात येणार आहेत.

या काळात सकाळी 10.45 ते दुपारी 12.12 पर्यंत हवाई सीमा सील करण्यात येणार असल्याने 7 दिवसात इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावरील सुमारे 800 उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी दर वर्षी दिल्लीच्या हवाई सीमा काही काळ सील केल्या जातात,


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)