गौण खनिजाच्या तक्रारीसाठी निवारण कक्ष स्थापन

सातारा- सातारा जिल्ह्यामध्ये वाळू व इतर गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक अथवा उत्खनन होत असल्याबाबत तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे तक्रार नोंदणी व निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. या कक्षाचा दूरध्वनी टोल फ्री क्रमांक 1077 असा असून जिल्हा खनिजकर्म विभागाचा ई-मेल आयडी miningofficersatara@gmail.com असा आहे. तरी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास दिलेला टोल फ्री क्रमांक व ई-मेल आयडीवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी दिली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)