मर्सिडिज बेन्झ देणार “सर्व्हिस ऑन व्हिल्स”

सातारा- भारतातील सर्वात मोठ्या लक्‍झरी उत्पादक कंपनी असलेल्या मर्सिडिज बेन्झने महाराष्ट्रातील भागीदार बी. यू. भंडारी मोटर्सच्या साह्याने ग्राहकांना “सर्व्हिस ऑन व्हिल्स” सेवा देण्यास सुरूवात केली आहे. ग्राहक सेवेच्या दुसऱ्या टप्प्याचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील 25 शहरांमध्ये दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या पहिल्या पर्वाच्या यशानंतर अहमदनगरमधून दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली. नगर, सांगली, रत्नागिरी असा प्रवास करून साताऱ्यात दोन दिवस ग्राहकांना सेवा देण्यात आली.

ज्या शहरांमध्ये थेट डिलरशीप नाही अशा व्दितीय आणि तृतीय श्रेणी शहरामधील ग्राहकांना सेवा देण्याच्या उद्देशाने “सर्व्हिस ऑन व्हिल्स” देण्यात आहे. जुलै 2016 मध्ये “माय मर्सिर्डिज, माय सर्व्हिस” या अनोख्या सेवा विभागाचा भाग म्हणून उप्रकम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्राहकांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा पुरविल्या जात आहेत. याबाबत अधिक माहिती देताना डीलर प्रिन्सिपल देवेन भंडारी म्हणाले, “सर्व्हिस ऑन व्हिल्स” हा भारतातील लक्‍झरी कार बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकारचा ग्राहककेंद्री पहिला उपक्रम आहे.

मर्सिडिज बेन्झ कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली आहे. ग्राहकांनी सूचना केल्यानंतर कंपनीचा ट्रक ग्राहकांच्या भागात पोहचेल. तिथे गाडीची तपासणी, दुरूस्ती व सर्व्हिस केली जाईल. ट्रकमध्ये ग्राहकांना आरामदायी सुविधा तसेच गाडीविषयी शंकांचे निरसन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांचा सर्व्हिसिंगसाठी मोठ्या शहरामध्ये जाण्यासाठी वेळेची आणि पैशाची देखील बचत होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)