सेरेना विल्यम्सवर पराभवाची नामुष्की

सॅन जोस: आधुनिक काळातील महिला टेनिसची सम्राज्ञी सेरेना विल्यम्स पहिल्या अपत्यजन्मानंतर “कम बॅक’ करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु मुबादला सिलिकॉन व्हॅली क्‍लासिक टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पत्कराव्या लागलेल्या एकतर्फी पराभवामुळे सेरेनाच्या पुनरागमनाच्या प्रयत्नांना जबरदस्त धक्‍का बसला. कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर सेरेनाची ही पाचवी स्पर्धा आहे.

महिला एकेरीतील पहिल्याच फेरीच्या लढतीत योहाना कॉन्टाने सहाव्या मानांकित सेरेनाचा 6-1, 6-0 असा केवळ 52 मिनिटांत पराभव केला. आतापर्यंत तब्बल 23 ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकणाऱ्या सेरेनाच्या देदीप्यमान कारकिर्दीतील हा सर्वाधिक एकतर्फी पराभव ठरला. या संपूर्ण सामन्यात सेरेनाला केवळ एक गेम जिंकता आली. तीही पहिल्या सेटमधील आपल्याच सर्व्हिसवरील पहिली गेम तिने जिंकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी तीन वेळा मुबादला क्‍लासिक स्पर्धा जिंकणाऱ्या सेरेनाने या पराभवानंतरही आपल्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले व पुन्हा जोमाने परतण्याची ग्वाही दिली. सेरेनाचा याआधीचा सर्वाधिक एकतर्फी पराभव 2014 डब्लूटीए टूर फायनल स्पर्धेतील होता. त्या वेळी सिमोना हालेपने सेरेनाचा 6-0, 6-2 असा पराभव केला होता. परंतु त्या सामन्यात सेरेनाने दोन गेम जिंकल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)